पोलिसाने केली गटईकाम करणाऱ्या युवकाला बेदम मारहाण
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जानेवारी):-शहरातील दिल्लीगेट नीलक्रांती चौक येथील गटई काम करणारे दिलीप मनोज बोडखे हे दुकानात काम करत असताना दोन इसम त्यांच्या गाडीवर येऊन बसले व नंतर एक मुलगी आली हे गाडीची नुकसान करत असताना नुकसान करू नको अशी विनंती केली असता त्यातील एक इसम मी पोलीस आहे माझं तू काय करशील असे म्हणून ही टपरी तुझी आहे का असे विचारले असता मी हो म्हणत त्याने माजलास का असे बोलून त्याने व त्याच्या सोबत असलेला एक इसम व एक मुलगी तिघांनी मिळून बेदम मारहाण शिवीगाळ करत मला लाथा बुक्क्यांनी मारत दोन दात पाडले डाव्या पायाचे दोन बोट मोडले डोळ्याला इजा झाली असुन सदर ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात आली असून ही पूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिला असून देखिल गुन्हा दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गेलो असता यातील एक इसम हा पोलीस खात्यात असल्याने त्याला वाचवण्याकरिता हलगर्जीपणा करत आहे.पोलीस कर्मचाऱ्यांकडून विनाकारण जीव जाईपर्यंत मारहाण करून गुन्हा नोंदवायला हलगर्जीपणा होत असून मारहाण झालेल्या गटई कामगार दिलीप बोडखे यांची जिल्हा रुग्णालयात विचारपूस करताना जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत कैलास गांगर्डे, अभिजीत खरात,नरहरी खरात,मनोज बोडके,सुधाकर पतंगे आदी उपस्थित होते.हा संपूर्ण प्रकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे.तरी या प्रकरणात जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भेट घेणार असल्याचे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगितले.