देवळी प्रतिनिधी/सागर झोरे:-10 डिसेंबर 2022 रोजी तळेगाव येथे सत्याग्रही घाटामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या व कुजलेल्या स्थितीत मिळून आला होता.सदर मृतदेहाची कोणतीही ओळख पटवून आली नसल्याने तसेच आरोपीचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा व तीन पोलीस स्टेशन तळेगाव येथील दोन व आर्वी येथील एक अशी एकूण सहा पथके या गुन्ह्याच्या सखोल तपासाकरिता नेमण्यात आली होती.या अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या तपासणी करिता तिथे मिळाल्या वस्तूच्या आधारे बेन्टेक्स दागीणे विक्रेते कापड विक्रेते टेलर व चप्पल विक्रेत्यांच्याकडे सुद्धा शहानिशा करण्यात आली होती.तसेच गुरेढोरे चारणारे,जंगलातील लाकूडतोड यांना सुद्धा चौकशी करिता बोलवण्यात आले होते. तसेच आशा वर्कर दोनशे महिलांची चौकशी करून शोध घेण्यात आला होता.आणि सायबर सेलच्या मदतीने सखोल तांत्रिक तपास करण्यात आला होता.अशा पद्धतीने तपास करीत असताना नेर जिल्हा यवतमाळ येथील गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहितीनुसार मंगरूळ चव्हाळा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील एका महिला मागील बऱ्याच दिवसांपासून वडाळी अमरावती शहर येथे लग्न करता गेल्यानंतर आज पावतो मिसिंग आहे आणि तिचा काहीतरी घातपात झालेला असावा या माहितीनुसार मुंबई येथील तिच्या आईला नशेरा चरपुष पवार यांना तळेगाव पोलीस स्टेशन येथे बोलवून घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तू दाखवल्या असतात त्यांनी सदर वस्तू योजना खात्रीपूर्वक केले आणि त्यानंतर सदर तपास करण्यात आला जोशना हिचा नवरा मनीष भोसले व त्याचा मावसभाऊ प्रवीण पवार यांच्या हालचाली संशयापद असल्याने निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा यवतमाळ येथील वेगवेगळ्या फासेपारधी राहत असलेल्या बेड्यावर शोध घेत असताना हे दोघे मिळून आले नाही त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याचा सात फेर तालुका नेर येथील जंगलात कसून शोधून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तळेगाव येथे आणून त्यांच्याकडे घटनेबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक,डॉ. सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आर्वी,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये,पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड,हुसेन शहा, पवन भांबुरकर,फौजदार संतोष दरगुडे,पोलीस हवालदार निरंजन वरवे, गजानन लामसे व पथक यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”