श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१५ जानेवारी):- मकर संक्रांतीदिनी श्रीरामपूर येथील मोरगे वस्ती भागामध्ये पतंग उडविताना भूषण शरद परदेशी नावाचा तरुण तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.त्याला नगर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकतीविषयी चिंता व्यक्त होत आहे.जखमी तरुण हा बावीस वर्षे वयाचा आहे. त्याला प्रारंभी श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता स्थानिक लोकांनी हलविले होते.मात्र तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर भूषण याला तातडीने नगरला पाठविण्यात आले.भूषण हा अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सायंकाळी पाच दरम्यान ही घटना घडली.तो मित्रांसमवेत गच्चीवरून पतंग उडवित असताना तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
