नगर प्रतिनिधी (दि.१५ जानेवारी):-नगर शहरातील कोठला परिसरातील मंगळवार बाजार येथे रात्री ७ च्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले,याचे रूपांतर दगडफेकीत झाले एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली यात 2 युवक जखमी झाले,3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्याचे नुकसान झाले,पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक खैरे,पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,सपोनि/देशमुख पिगळे,उपनिरीक्षक समाधान सोळंके,पवार, आदी फौजफाट्याशह घटनास्थळी दाखल झाले नागरिकांना शांत रहाण्याचे आवाहन करण्यात आले,घटनास्थळी दगडाचा खच पडला होता,जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले,पोलीस परिसरात फिरून आरोपीचा शोध घेत आहेत,तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
