श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१६ जानेवारी):- दि.२१ डिसेंबर 2022 रोजी रोजी ललित सुभाष गुगळे रा.श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की,दि.19/12/2022 रोजी आज्ञात चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या घरासमोरुन त्यांची एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरुन नेली आहे.अशी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशनला गुरनं/1071/2022 भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात श्री/रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,वरील गुन्हातील मोटारसायकल रविंद्र विठ्ठल पवार (रा.साळवणदेवी रोड श्रीगोंदा) याने चोरली आहे व तो श्रीगोंदा बस स्टॅन्डवर येणार आहे.त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे सापळा लावणेबाबत सांगीतले असता श्रीगोंदा येथील बस स्टॅन्डवर दिनांक 13/01/2023 रोजी 16/00 वा.चे सुमारास सापळा लावुन संशयीत ईसम रविंद्र विठ्ठल पवार यास ताब्यात घेतले असता त्याचेकडे मोटर सायकल चोरीबाबत कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचेकडुन गुन्ह्यातील एच एफ डी डिलक्स एम.एच.16 ऐ के 2666 मोटर सायकल व इतर गुन्हातील चोरी केलेल्या सहा मोटर सायकल एकुण 2,37,000/- रु किंमतीच्या सात मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.आरोपी कडुन मोटार सायकल चोरीचे खालील गुन्हे उघडकीस आले आहे.
1) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 1071/2022 भादवी कलम 379
2) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 22/2023 भादवी कलम 379
3) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 41/2023 भादवी कलम 379
आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी मोटारसायकलचे गुन्हे उगडकीस येण्याची शक्यता आहे.सदरील गुन्हाचा तपास पोना/2138 बी.एल.खारतोडे करत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोना/खारतोडे,पोकॉ/पठाण, पोकॉ/नवसरे यांनी केली आहे.
