अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ जानेवारी):-औरंगाबाद येथुन प्रवासी म्हणुन बसलेल्या इसमांनी निवडुंगे,ता.पाथर्डी येथे जाण्याचा बनाव करुन वाहन चालकास चाकुने मारहाण व जखमी करुन त्यांच्या ताब्यातील 6,51,000/- (सहा लाख एक्कावन्न हजार) रुपये किंमतीची कार,दोन मोबाईल फोन,घड्याळ व रोख रकमेची जबरी चोरी करणारे (03) तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की, दि.12/01/2023 रोजी फिर्यादी श्री.शिवाजी अभिमन्यु वाघमारे,वय 40, धंदा खाजगी नोकरी,रा. रत्नापुर,ता.कंळब,जिल्हा उस्मानाबाद हल्लीरा.कोंढवा, जिल्हा पुणे हे रिलायन्स डिजीटल,पिंपरी,पुणे येथे नोकरीस असुन त्यांचे सुट्टीचे दिवशी स्वत:चे वॉगनआर कारमधुन प्रवासी भाडे करता. दि.12/01/23 रोजी त्यांना पुणे ते औरंगाबाद असे प्रवासी भाडे मिळाल्याने त्यांनी पुणे येथुन औरंगाबाद पर्यत भाडे केले व त्यानंतर रात्री 10.30 वा.औरंगाबाद येथील बाबा पेट्रोलपंप येथे थांबुन एंजट मार्फत औरंगाबाद ते पिंपरी चिंचवडसाठी तीन प्रवाशा करीता भाडे बुक करुन दिले. फिर्यादी औरंगाबाद-नगर मार्गे पिपंरी चिंचवडकडे जात असताना गाडीतील प्रवाशांनी पांढरीपुल येथे आल्यावर नातेवाईकांना फोन लावला व निवडुंगे येथुन आमचे आत्याला घेवुन परत पुणे येथे जायचे आहे असे सांगितले. निवडुंगे येथे आल्यावर रस्त्यावर गाडी थांबण्यास सांगुन तु आम्हाला शिव्या का दिल्या असे म्हणुन एका इसमाने फिर्यादीचे गळ्यात मफलर टाकुन ओढले व एका इसमाने चाकुने वार व मारहाण करुन जखमी केले व फिर्यादीची 6,51,000/- रु.किंमतीची वॉगनआर कार,दोन मोबाईल,घड्याळ,रोख रक्कम व कागदपत्रे जबरीने चोरुन घेवुन पळुन गेले आहे. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 30/2023 भादविक 394, 34 प्रमाणे अनोळखी इसमां विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे,सफौ/मनोहर शेजवळ,राजेंद्र वाघ, पोहेकॉ/बाळासाहेब वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार, संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,संतोष लोढे,पोना/ज्ञानेश्वर शिंदे,भिमराज खर्से, दिपक शिंदे,पोकॉ/रविंद्र घुंगासे,सागर ससाणे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या व पथकास लागलीच रवाना केले.पथकाने निवडुंगे,ता.पाथर्डी ते औरंगाबाद अशी पेट्रोलिंग करुन रस्त्यातील हॉटेल, पेट्रोलपंप व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तपास करत असतांना पोनि/श्री.अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी प्रसावतनगर,जिल्हा परभणी येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्याबाबत तांत्रिक विश्लेषनाव्दारे खात्री करण्यात आली व पोनि/श्री. अनिलक कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रसावतनगर,जिल्हा परभणी येथे जावुन संशयीतांचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन त्याचे राहते घरी सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसमा येताना पथकास दिसला पथकाची खात्री होतास त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव व गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) स्वप्नील शंकर सोनटक्के वय 23, रा.प्रसावतनगर,जिल्हा परभणी असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने त्याचे इतर दोन साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे दोन साथीदारांना त्यांचे दिले पत्यावर जावुन शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 2) भोला ऊर्फ टिकली ऊर्फ ओमकार सुनिल शिंदे वय 21 व 3) नारायण रमेश खुपसे वय 19 दोन्ही रा.प्रसावतनगर, जिल्हा परभणी असे असल्याचे सांगितले.सर्व आरोपींना गुन्ह्यात चोरीस गेलेले 22000/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व एक घड्याळ असे मुद्देमालासह ताब्यात ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी,श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
