वर्धा देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-जानेवारी 2023 ला नविन लिनेस क्लब पुलगाव चा पदग्रहन सोहळा एस प्ले गृप शुभांगी टाले पद्मगुलाब नगर हनुमान मंदिर पुलगाव येथे आनंदात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.यावेळी राजश्री जमणारे प्रेसिडेंट, शुभांगी डाखोरे सेक्रेटरी, शिल्पा जाधव ट्रेझरर यांना पीडीपी इस्टाॅलिंग ऑफिसर शुभदा रुद्रकार यांनी शपथ दिली.रिजन चेअरपर्सन ज्योती देवतारे वर्धा लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट रिमा चौधरी,सुनीता बावणेर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.शुभदा रुद्रकार यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात लिनेस क्लबच्या वतिने सामाजिक चळवळीत पञकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पञकार योगेश काबंळे यांचा शाल , स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.लिनेस क्लब समाजातील तळागाळातील महिलांकरीता तथा प्रवाहात येणाऱ्या लोकांकरीता काम करीत असल्याचे शुभदा रुद्रकार यांनी सांगितले.यावेळी “एक मुठी अनाज” या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आर के शाळेच्या एका गरीब विद्यार्थिनीला आणि गरीब महिलांना धान्याची किट वाटप करण्यात आली. “सेवसृष्टी” अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.नंदाताई देवारे व्हाईस प्रेसिडेंट,जयश्री चव्हाण टेमर ट्रेझरर,मेघा देशमुख परमनंट प्रोजेक्ट डायरेक्टर,शुभांगी टाले व प्रिया नायसे,वाढदिवस समिती यांनीही शपथ घेतली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयश्री ठाकरे यांनी केले.तर स्वागतगीत प्रिया नायसे, माया टाके यांनी गायले आभार शुभांगी डाखोरे यांनी मानले.
