तुळजापूर प्रतिनिधी (अजित चव्हाण):-तुळजापूर धाराशिव जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो.धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे.मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील अशा आशाने शेतकरी जगत आहे.परंतु गेल्या तीन दशकापासून कृष्णा खोऱ्यातील पाणी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आण्णासाहेब दराडे यांनी शक्तिप्रदर्शन करत श्री तुळजाभवानी मंदिरात उजनी धरणातील पाणी टँकरने आणून तुळजाभवानी मंदिरातील पायऱ्यांची स्वच्छता करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे यांनी चित्ररथ यात्रेला सुरुवात केली.
तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालया मध्ये आण्णासाहेब दराडे यांनी नागरिकांशी संवाद साधला धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ मुक्तीसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे यावेळी बोलताना व्यक्त केले.आण्णासाहेब दराडे यांनी शेतकऱ्यांची अडीअडचणी समजून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून गोरगरीब शेतकरी,बेरोजगारांच्या प्रश्नावर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या सर्वसामान्य जनतेची पिळवणूक रोखण्यासाठी आणि जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी याकरिता आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली.
यावेळी संभाजी भोसले, प्रा.राम घुगे, महेश पाटील, अभिमान दराडे, अंबादास घुगे, नितीन लोभे, जोतीराम मोजगे, गणेश घुगे, केशव शिवले यांच्यासह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
