अहमदनगर (दि.६ सप्टेंबर):-५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त नगर शहरातील प्रेरणा प्रतिष्ठाण यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन केले होते.

श्री.नाथ विद्यामंदिर वसंत टेकडी शाळेतील शिक्षक शिवाजी देविदास बुधवंत यांना हा पुरस्कार देण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी व प्रमाणपत्र होते.

सदर पुरस्कार सोहळा हा जिल्हापरिषदचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली तर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आला.या वेळी जिल्हापरिषदेचे शिक्षणअधिकारी भास्कर पाटील,न्यू आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजचे माजी प्राचार्य शितोळे सर तसेच शिरीष मोडक सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
