हरवलेले १ लाख ५० हजारांचे मोबाईल फोन पुन्हा तक्रारदारांच्या केले स्वाधीन
अहमदनगर (दि.११ सप्टेंबर):-कोतवाली पोलीस स्टेशन हददीतील आठवडे बाजार,बसस्टॅन्ड व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन गहाळ झालेले मोबाईल फोनची गहाळ रजिस्टरला नोंद घेवुन अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईल बाबत अधिक माहीती संकलीत करुन नगर दक्षिण सेल पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले होते.
गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेवुन आज ११ सप्टेंबर २०२४ रोजी गहाळ झालेल्या मोबाईलच्या मुळ मालकांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे बोलाकुन घेवुन नमुद गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करुन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांच्या हस्ते विविध कंपन्याचे महागडे मोबाईल एकुण १५ फोन किंमत १ लाख ५০ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/प्रताप दराडे, पोना/सलीम शेख, पोको/दिपक रोहोकले, पोकॉ/तानाजी पवार, पोकॉ/सत्यम शिंदे, मपोकॉ/भागवत,पोकॉ/अनुप झाडबुके,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/राम हंडाळ,पोकॉ/संदिप कव्हळे,मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.