अहमदनगर (दि.१५ सप्टेंबर):-समाजातील वंचित महिला आणि बालकांसाठी गेली ३५ वर्षे अथक कार्य करणाऱ्या स्नेहालय संस्थेने यंदाच्या गणेशोत्सवात एक मोठा सामाजिक अभियान सुरू केला आहे.

“मी नाही तर कोण, आणि आज नाही तर केव्हा?” या विचाराने प्रेरित होऊन स्नेहालयच्या युवा कार्यकर्त्यांनी विविध समाजविघातक समस्यांविरुद्ध लढा देण्यासाठी महिला व बालकांसाठी सुरक्षेची आणि जागृतीची मोहीम सुरू केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवात स्नेहालयच्या ५० स्वयंसेवकांचे पथक भरकटलेले,अनाथ, निराधार बालक आणि महिलांना मदत करत आहे.बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत,या मोहीमेत पथनाट्य,पोस्टर,आणि जागृती सत्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.
बालकांच्या हरवण्यापासून ते मुलींच्या छेडछाडीपर्यंत, या सर्व सामाजिक समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी स्नेहालयचे स्वयंसेवक गणेशोत्सवाच्या गर्दीत गस्त घालत आहेत.
यामध्ये स्नेहालयचे विविध उपक्रम,जसे की उडान,स्नेहधार बालभवन,रेडिओ नगर 90.4, आणि केरींग फ्रेंड हॉस्पिटल आदींचा समावेश असून,या उपक्रमांना अहमदनगरातील तरुण मित्र मंडळ,प्रतिष्ठान संघटना,पत्रकार, उद्योजक आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणारी ही मोहीम अहमदनगर जिल्ह्याला बालविवाहमुक्त बनवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
“गणेशोत्सव हा केवळ उत्सवच नाही तर सामाजिक बदलासाठी एक साधन आहे,” असे मत स्नेहालयकडून व्यक्त केले जात आहे.
प्रविण कदम उप्रकम समन्वयक मो.9011026495
