अहमदनगर (दि.१५ सप्टेंबर):-गणेश विसर्जनाचे अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल १२० गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.

दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी भिंगार शहरातील गणेश विसर्जन होत असल्याने या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163(2) प्रमाणे अहमदनगर शहराच्या भौगोलिक हद्दीमध्ये गणेशोत्सवा दरम्यान दि. 15 सप्टेंबर ते दि.17 सप्टेंबर 2024 रोजी या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील एकुन 120 गुन्हेगारांना प्रवेशबंदी केल्या बाबतचा आदेश सुधीर पाटील उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग, यांनी पारित केला आहे.
तसेच भिंगार शहरात अंतिम चौक येथे इसम नामे चेतन भागुजी शहापुरकर रा.पाटील गल्ली,भिंगार हा मा. उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग यांचे कडील दि.15 सप्टेंबर रोजी ते दि.17 सप्टेंबर 2024 रोजीचे शहराचे भौगोलिक हद्दीमध्ये प्रवेश बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं.686/2024 भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक श्री. जगदीश मुलगीर,सहा. पोलीस उपनिरिक्षक रेवन्नाथ दहिफळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय गव्हाणे,दिपक शिंदे,संदिप घोडके, अमोल आव्हाड,समीर शेख,यांनी केली आहे.
शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण
कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,शंभूराजे प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित यंदा रविवार दि.१५/०९/२०२४ रोजी,आ.संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते गणरायची आरती सोहळा आयोजित केले आहे.तसेच सत्यनारायण महापुजा व महाप्रसाद वाटप आयोजित केला असून सर्व गणेश भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
ठिकाण :- कै.शंकर भाऊ वाणी चौक पाईपलाईन रोड,सावेडी,अ.नगर
आरती वेळ:-सायंकाळी ७.०० वा,महाप्रसाद वाटप:-सा.८.०० ते आपल्या आगमनापर्यंत.
