अहमदनगर (दि.१५ सप्टेंबर)-जातीय तणाव,दंगलीत सहभाग, मारामारीसारखे गुन्हे दाखल असलेल्या अशा नगर शहर आणि परिसरातील एकूण ४७५ आरोपींवर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार नगर विभागाचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी ही कारवाई प्रस्तावित केली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.सामाजिक शांतता बिघडविणार्या गुन्ह्यांमधील आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
