तर ठरल..दर्यापूर तालुक्यातून सामाजिक कार्यकर्त्या काजलताई गवई विधानसभा निवडणुक अपक्ष लढविणार
वणी प्रतिनिधी:-अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातून सुशिक्षित घराण्यातील सामाजिक कार्यकर्त्या काजलताई गवई या विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहे.सौ.गवई/गायकवाड या जिल्ह्यात आपल्या वेगवेगळ्या आंदोलनाने व तसेच समाजकार्याने परिचित आहे.
गोरगरिबांना मदत करणे अन्याया विरुद्ध आवाज उठवणे तसेच महिलांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे या सर्व कार्याने त्या नागरिकांमध्ये परिचित आहेत.यावेळी त्यांनी दर्यापूर तालुका संपूर्ण पिंजून काढला आहे. आणि विधानसभा लढविण्यासाठी ठाम निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी एक वेळेस संधी देऊन पहावी या संधीचं सोनं करून दाखवील असे त्या म्हणाल्या.तर घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा व निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे.त्यामुळे न डगमगता मी लोकांची समाज सेवा करणार असल्याचे निर्णय घेऊन दर्यापूर तालुक्यातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सौ. काजल गवई/गायकवाड यांनी यावेळी सांगितले व या निवडणुकीत मतदार राजा नक्कीच मला कौल देतील व या माध्यमातून माझा विजय होईल अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.