Maharashtra247

लोकं म्हणायचे तो काय पोलीस होणार का.? मात्र फिरोजने जिद्दीने करुन दाखवलं..!!   

 

संगमनेर (प्रतिनिधी/दत्तात्रय घोलप):-अनेकदा लोक त्याला हिनवायचे आणि म्हणायचे की तू पोलीस कसा होणार तुझी उंची तर कमी आहे.

पोलीस होण्यासाठी उंची लागते अभ्यास करावा लागतो मात्र त्याने कुठेही न डगमगता चांगल्या प्रकारे सराव करत व्यायाम करून अभ्यासात पुढे राहिला.

हॉटेल स्वामीनारायण शिर्डी येथे पार्ट टाइम काम करून त्याने जिद्दीने पोलीस भरती केली आणि रायगड पोलीस मध्ये भरती झाला त्याचं नाव आहे फिरोज सय्यद.खरतर हा फिरोज सुनिल सय्यद कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख या गावी राहणारा घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची वडील देखील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते.

अशातच फिरोजला पोलीस दलात भरती व्हायचं होतं मात्र लोक कायमच टोमणे मारायचे यासर्व गोष्टीला कंटाळून त्याने अखेर घर सोडले आणि शिर्डी येथे हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली हे करत असताना त्याने पोलीस भरतीचाही अभ्यास केला.शारीरिक व्यायाम सराव कसरत करून त्याने अखेर रायगड पोलीसात भरती झाला.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या जडणघडणीमध्ये त्याचे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील मामा राजूभाऊ शेख तसेच असिफ शेख यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व सर्व मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.

भरतीसाठी साई निर्माण अकॅडमी शिर्डी यांच्यासह सर्व शिक्षकांनी देखील त्याला मार्गदर्शन केले.त्याचा हा प्रवास नक्कीच इतर युवकांना देखील प्रेरणादायी ठरणार आहे.

You cannot copy content of this page