अहमदनगर प्रतिनिधी (दि.१६ जानेवारी):-अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील नागपाल मोबाईल दालनात नुकतीच भाग्यवान विजेत्यांसाठी सोडत काढण्यात आली.यामध्ये शहरातील अभिजीत डुकरे व योगिता डुकरे यांना दहा ग्रॅम सोन्याचे नाणे बक्षिस मिळाले.दिवाळी निमित्त मोबाईल खरेदी करणार्या भाग्यवान विजेत्यांसाठी ही सोडत काढण्यात आली होती. विजेत्या डुकरे दांम्पत्यास नागपाल मोबाईल शॉपीच्या प्रिया नागपाल व विशाल नागपाल यांच्या हस्ते दहा ग्रॅम सोन्याचे नाणे बक्षिस देण्यात आले.यावेळी आकाश घाटविसावे,अजित पवार,अजित जगताप,संतोष बलदोटा,मनीष चोपडा,अतुल रच्चा, गोरख पडोळे, साजिद खान,प्रीतम तोडकर, राकेश सोनीमंडलेचा आदी उपस्थित होते.प्रिया नागपाल म्हणाल्या की, झोपडी कॅन्टीन येथे मागील पंधरा वर्षापासून नागपाल मोबाईल शॉपी नगरकरांना सेवा देत आहे. दिवाळी, पाडवा आदी सण,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल दालनात ग्राहकांसाठी खरेदीवर विविध बक्षिस ठेवण्यात येतात. फक्त व्यवसायाचा उद्देश न ठेवता दिल्या जाणार्या सेवेमुळे मोठा ग्राहकवर्ग जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. विशाल नागपाल म्हणाले की, ग्राहकांचे समाधान व त्यांच्या सेवेसाठी नागपाल परिवार सेवा देत आहे. मोठ्या विश्वासहर्तने ग्राहक चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाग्यवान विजेते डुकरे यांनी मिळालेल्या बक्षिसाने सुखद धक्का बसला. नागपाल मोबाईल दालनाची उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना जोडलो गेलो असल्याचे सांगितले.
