माझी वसुंधरा अभियान योजनेअंतर्गत चिंचोली गुरव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा;तृतीय क्रमांकाचे १५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर
संगमनेर तालुका (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):- महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या बक्षीसांतर्गत आ.श्री.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.जि.प.सदस्य श्री. महेंद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर पंचायत समितीचे बीडीओ श्री.नागणे यांच्या अथक प्रयत्नातून चिंचोली गुरव ग्रामपंचायतचे सरपंच श्री.विलास अण्णा सोनवणे,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतला एकूण पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागात 2500 ते 5000 लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचे एकूण 15 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झालेले आहे.
आज गावचा जो विशेष सन्मान अल्पावधीतच होत आहे त्यामध्ये सर्वाधिक कष्ट गावचे ग्रामसेवक श्री.भालेराव साहेब व त्यांच्या सोबत ग्रामरोजगार सेवक अनिल आभाळे यांनी घेतलेले आहेत.संपूर्ण चिंचोली गुरव ग्रामस्थांच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचे व चिंचोली गुरव ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.