Maharashtra247

स्वीफ्ट डिझायर कार चोरी करणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

 

अहमदनगर (दि.२ ऑक्टो):-स्वीफ्टडिझायर कार चोरी करणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलीसांनी तपास करत मुद्देमालासह जेरबंद केले आहे.बातमीची हकीकत अशी की,लोणवळा शहर पोलीस स्टेशन हद्वीतील फिर्यादी नामे शरीफा शेख यांची स्वीफ्ट डिझायर कार नंबर MH-14-HU-1771 ही लोणवळा बाजारपेठ येथे रेल्वे पार्कींगमध्ये पार्क केलेली स्वीफ्ट डिझायर कार अज्ञात चोरट्याने चोरी केले बाबत लोणवळा शहर पोलीस येथे गु.र.नं. 398/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा रजि.दाखल झाला आहे.

या घटनेबात कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरक्षक जगदिश मुलगीर यांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे तपास पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणा व्दारे तपास करुन सदर गुन्हयातील स्वीफ्ट डिझायर कार व आरोपी नामे तुषार बाळासाहेब कोल्हे (रा.नागेश्वर गल्ली पारनेर,जिल्हा अहमदनगर) यास स्टेट बँक चौक येथुन रोडने जात असताना त्यास थांबवले असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना स्वीफ्ट डिझायर कार व आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ/संदिप घोडके,दीपक शिंदे,अभिजित आरकल,रवि टकले,अजय गव्हाणे,अमोल आव्हाड,काळे,झिने कांतीलाल चव्हाण यांनी केली आहे.सदरची स्वीफ्ट डिझायर कार व आरोपीस पुढील तपासकामी लोणावळा शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.

You cannot copy content of this page