Maharashtra247

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई जाधव यांची नियुक्ती

 

नाशिक प्रतिनिधी:-छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.

त्या पाश्वभूमीवर तशी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे.संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली“९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी,कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना”आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष”या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे.अर्थातच,स्वराज्य संघटना “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष”म्हणून ओळखला जाईल असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं.

याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.त्यातच पक्ष वाढीसाठी व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात पदनियुक्तही मोठ्या प्रमाणात देण्यात आले आहे.छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.धनंजय जाधव सरचिटणीस महाराष्ट्र स्वराज्य पक्ष यांच्या मार्गदर्शनाने केशव दादा गोसावी उत्तर महाराष्ट्र प्रमुख,ज्ञानेश्वर भाऊ थोरात उत्तर महाराष्ट्र सचिव,उमेश शिंदे सर नाशिक संपर्कप्रमुख,डॉ.रुपेश नाटे जिल्हाप्रमुख नाशिक,रोशन भाऊ खैरे महानगर प्रमुख नाशिक आणि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेखा जाधव यांचीही नाशिक जिल्हाप्रमुख पदी तसेच सौ.रागिणी आहेर यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीने महिला वर्गामध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झाले असून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता आपल्या हक्काचा माणूस पदावर बसलेला आहे अशी अपेक्षा महिलावर्ग व्यक्त करत आहे.

You cannot copy content of this page