Maharashtra247

भूमी अभिलेख कार्यालयात अँटी करप्शन ट्रॅप १० हजार घेताना रंगेहात पकडले

 

 

अहमदनगर (दि.३ ऑक्टो):-यशस्वी सापळा कारवाई

▶️ *युनिट -*अहमदनगर.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 64 वर्षे

▶️ *आलोसे-*1) संजय भिमराव मनवरे, वय 56 वर्ष, पद निमतानदार,उप अधीक्षक,भूमि अभिलेख कार्यालय,पाथर्डी जि. अहमदनगर (वर्ग-3), रा.भगवाननगर, पाथर्डी, ता.पाथर्डी जि.अहमदनगर.

▶️ *लाचेची मागणी-*

25,000/- रुपये ते 30,000/- रुपये.

▶️ *लाच स्विकारली-*

पहिला हप्ता म्हणून 10,000/ रुपये

▶️ *हस्तगत रक्कम-*

10,000/-रुपये

▶️ * *लाचेची मागणी**

दि.18/09/2024

▶️ **लाच स्वीकारली**

दि. 03/10/2024

▶️ *लाचेचे कारण* 

तक्रारदार यांचे नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणी बाबत व मोजणीचा रिपोर्ट व नकाशा मा. न्यायालयात सादर करणेकरीता आलोसे यांनी लाच मागणी केल्याबाबतची तक्रार ला.प्र. वि. अहमदनगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 18/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे यांनी पंचा समक्ष 25,000/- रुपये ते 30,000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रकमेचा पहिला हप्ता म्हणून 10,000/= रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

दि. 03/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडून आलोसे यांनी 10,000/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.*

▶️ **सापळा व तपास अधिकारी*

श्री. अजित त्रिपुटे ,

पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर. मोबा.नं.8329701344

▶️ *सापळा पथक*

पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे,उमेश मोरे,बाबासाहेब कराड , रवींद्र निमसे, चापोहेकॉ दशरथ लाड

▶️ **मार्गदर्शक* –

*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 91 93719 57391

*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक

मो नं 9404333049

▶️ *सहकार्य* –

*1)श्री. स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

मोबा.नं. 9403234142

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश, नाशिक.

—————————-

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.

*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

=============

You cannot copy content of this page