Maharashtra247

शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी उच्चशिक्षीत तरुण करायचा राज्यभर चोऱ्या मात्र कोतवाली पोलिसांनी लावला असा सापळा चोरटा अडकला जाळ्यात

 

अहिल्यानगर (दि.६ ऑक्टो):-शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी उच्चशिक्षीत तरुण भरदिवसा बंद फ्लॅट फोडून राज्यभर करत होता चोऱ्या अखेर कोतवाली गुन्हे शोध पथकाच्या जाळयात अडकलाच पोलिसांनी लाखोंचा ऐवज हस्तगत केला.बातमीचे हकीकत अशिकी,दि.११/०४/२०२३ रोजी पार्थ हाईटस मोतीनगर केडगाव येथील फिर्यादी या कामानिमीत्त घराबाहेर गेले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम भरदिवसा चोरुन नेले आहे.

वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं। ३५१/२०२३ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवालीचे गुन्हे शोध पथक हे सदर आरोपीच्या मागावर होते तांत्रिक दृष्टीने बारकाईने तपास करुन सदर आरोपी प्रज्वल गणेश वानखेडे (रा.टी.व्ही. सेन्टर घर नं.शाच,२७/३ हडको,श्रीकृष्णनगर जि. छत्रपती संभाजीनगर) हा औरंगाबाद येथील रहिवासी असल्याबाबात माहीती मिळाली होती परंतु सदरचा आरोपी हा उच्च शिक्षित असल्याने तो फोन चा वापर तांत्रिक रित्या करत व वारंवार आपल्या राहण्याचा ठाव ठिकाणा हा पुणे,नाशिक, पालघर,कोल्हापूर असा बदलत असल्याने त्याला ताब्यात घेणे कठीण होते त्यानंतर दि.२/०१/२०२४ रोजी साई गॅलेक्सी अपार्टमेन्ट केडगाव अहमदनगर येथे फिर्यादी हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद फ्लॅटचे कुलूप तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली म्हणून वगैरे मजकूरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं। १०/२०२४ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा रजि,दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा पुन्हा वरील आरोपीनेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीच्या मागे कोतवाली गुन्हे शोध पथक हे मागावर होते अखेर दि.०४/१०/२०२४ रोजी सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली गुन्हे शोध पथकास बातमी मिळाली की,सदरचा आरोपी नामे प्रज्वल गणेश वानखेडे हा औरंगाबाद येथील चितेगाव येथील एम.आय.डी.सी येथे असले बाबत माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ चितेगाव येथे जावुन मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्यांनी सदरचे वरील गुन्हे शेअर मार्केटमध्ये पैसे हरल्याने कर्ज बाजारी झाल्याने कर्ज मिटविण्यासाठी घरफोडीचे गुन्हे केले असल्याची कबुली त्याने दिली तसेच त्याने पुणे, नाशिक,पालघर, कोल्हापुर येथे दिवसा घरफोडी केल्याने त्याचेवर तेथे गुन्हे दाखल आहेत.त्याने कोतवाली पोस्टे हददीत केलेल्या वरील दोन घरफोडीतील गेला माल ३,९८,५००/रु, किंमतीचा सोन्याचा मुददेमाल व आरोपीने गुन्ह्यात वापरलेली त्याची दुचाकी असा एकुण ५,००,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुढील तपास सपोनि विकास काळे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,सपोनि.योगिता कोकाटे,विकास काळे, पोसई.कृष्णकुमार सेदवाड व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ.योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, विशाल दळवी,सलीम शेख,संदिप पितळे,विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके,मोहन भेटे,नकुल टिपरे,विजय काळे,पोकॉ/अभय कदम,अमोल गाढे, सतिष शिंदे,अतुल काजळे,राम हंडाळ, संदिप थोरात,मपोना/ वर्षा पंडीत,मपोकाँ / सोनल भागवत दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ /राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page