महाराष्ट्र शासन आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी नगर जिल्हा संघाची निवड जाहीर;युवा कुस्तीगिरांनी जिल्ह्याला मिळालेला वारसा पुढे चालू ठेवावा आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर दि.७ ऑक्टो):-शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबर आपल्या आवडीच्या खेळाकडे लक्ष द्यावे जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असते शासकीय नोकरीसाठी राज्य सरकारने खेळाडूंसाठी ५ टक्के आरक्षण ठेवलेले आहे तरी खेळाडू यांनी खेळाचे चांगले प्रदर्शन करीत आपले करिअर करावे नगर जिल्ह्याने नेहमीच कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविला आहे तरी युवा कुस्तीगिरांनी मिळालेला वारसा पुढे असाच चालू ठेवावा असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी कुस्ती लावताना अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप समवेत सचिव प्रा. डॉ.पै.संतोष भुजबळ,खजिनदार पै. शिवाजी चव्हाण,उत्तर महाराष्ट्र केसरी पै.युवराज करंजुले,पै. धनंजय खोसे,पै.शंकर खोसे,पै. मयूर रोहोकले,उद्योजक नितीन आव्हाड,पै.स्वप्निल भुजबळ,श्री. निलेश मदने आदी उपस्थित होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि.7 ते 9 ऑक्टोबर 2024 दरम्यान “स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024-25” चे आयोजन सहकारी सूत गिरणी मैदान,जळगाव रोड,सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. सदर स्पर्धेसाठी दि.4 ऑक्टोबर 2024 रोजी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीने अहमदनगर जिल्हा संघ निवड चाचणी पार पडली.सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या कुस्तीगीरांची नावे पुढीलप्रमाणे :
वरिष्ठ पुरुष
57 किलो: जयेश राजेंद्र जाधव
61 किलो: सचिन सुनील मुरकुटे
65 किलो: ऋषिकेश एकनाथ उचाळे
70 किलो: कुमार किशोर देशमाने
74 किलो: मयूर कैलास तांबे
79 किलो: संदिप परमेश्वर लटके
86 किलो: आकाश अशोक घोडके
92 किलो: पृथ्वीराज बाळासाहेब वनवे
97 किलो: अक्षय चंद्रकांत कावरे
125 किलो: सुदर्शन महादेव कोतकर
वरिष्ठ महिला
50 किलो: आयशा शकूर शेख
53 किलो: सोनाली संतोष दरेकर
55 किलो: धनश्री हनुमंत फंड
57 किलो: चैताली संजय घुले
59 किलो: ऋतुजा विश्वनाथ बर्डे
62 किलो: रचिता वसंत मतकर
65 किलो: समीक्षा गोरख टोणगे
68 किलो: पिया शिवाजी बेरड
72 किलो: कामिनी पंढरीनाथ देविकर
76 किलो: दिव्या गुरुलिंग शिलवंत आदींचा समावेश असून सर्व विजयी कुस्तीगीरांचे यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.