वर्धा जिल्हा प्रतिनिधी/सागर झोरे:-दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दि.७ ते १४ जानेवारी रोजी नजिकच्या कोपरा (चाणकी) येथील श्री संत फक्कडनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी मंदिरात जाऊन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मोठ्या भाव भक्तीने पुजा अर्चना केली.सप्ताहात विविध कार्यक्रमात फक्कडनाथ महाराजांचा विधीवत अभिषेक,आरती.श्री गुरूदेव सेवा मंडळाचे खंजिरी भजन.वारकरी संप्रदायाचे भजन,हरिपाठ,दुपारी गोपालकाला व सायंकाळी महाप्रसाद व दहीहंडी चा कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला.फक्कडनाथ महाराज देवस्थान कमेटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कडाक्याच्या थंडीत देखील पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.”श्री संत फक्कडनाथ महाराज की जय”या पावण नामघोषाने कोपरा नगरी दुमदुमली होती.दिंडी पालखी सोहळ्याआले प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व मानधन देण्यात आले.यशस्वीतेसाठी फक्कडनाथ महाराज देवस्थान कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

