अहमदनगर प्रतिनिधी (दि.१८ जानेवारी):-चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या वतीने अहमदनगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवारी (दि.22 जानेवारी) महिला मेळावा व सामुदायिक हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात महिलांसाठी आरोग्यावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन,विविध उपक्रम व महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.या मेळाव्यात सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या जिल्हाध्यक्षा (उत्तर) मीनाताई गायकवाड व जिल्हाध्यक्षा (दक्षिण) सुनंदा शेंडे यांनी केले आहे. चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या संकल्पनेतून महिलांचे संघटन करुन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दुपारी 12 ते 4 या वेळेत हा सोहळा रंगणार आहे.खडतर परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना उच्चशिक्षित करुन त्यांना घडविणार्या सर्व जाती-धर्मातील महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या न्याय हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. महिलांसाठी सोडत काढून पैठणी साडीचे बक्षिस दिले जाणार आहेत.तर महिलांना वस्तूरुपी वाण देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
