महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीयाच्या प्रदेश सरचिटणीसपदी विशाल काळे यांची निवड
संगमनेर (प्रतिनिधी):-माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे सोशल मिडीया प्रमुख असलेले विशाल मच्छिंद्र काळे यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीयाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे.
विशाल काळे हे अनेक वर्षांपासून मा.महसूलमंत्री आमदार थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सोशल मिडीयाचे समन्वयक म्हणून काम पाहत असून काँग्रेस पक्षाचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्यासाठी सोशल माध्यमांद्वारे ते सातत्याने प्रयत्नशील असतात.विशाल काळे हे सर्वसामान्य कुटूंबातील असून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी खूप कमी काळात सोशल मिडीयात आपले वेगळे वलय निर्माण केले आहे.
कामाची तत्परता,अचूकता,संघटन कौशल्य याच कामाची पोच पावती म्हणून त्यांना यापुर्वीही युवक काँग्रेसकडून सुपर ६० चा सन्मान मिळाला आहे.आणि आता त्यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस सोशल मिडीया प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
या निवडीनंतर विशाल काळे म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष गोरगरीब व सर्वसामान्यांचा पक्ष असून आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यातील जनतेकरिता रात्र दिवस काम करत आहेत.हाच सेवाभावी विचार घेऊन आपण ही संगमनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाचा व्यापक विचार प्रत्येक खेड्यातील व वाडी वस्तीवरील तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक सक्षमतेने काम करू असेही ते म्हणाले.
विशाल काळे यांच्या निवडीबद्दल मा.मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात,मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,आमदार सत्यजीत तांबे,रणजितसिंह देशमुख, कारखाना संचालक इंद्रजितभाऊ थोरात,कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,संतोष हासे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन गुंजाळ यांनी अभिनंदन केले आहे.