Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे महसूलमंत्री ना.विखे पाटील करणार विविध विकासकामांचे उद्घाटन;बहुजनांचे प्रेरणास्थान आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे होणार भूमिपूजन 

संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी अकरा कोटी पन्नास लाखांचे विविध विकासकामांचे उद्घाटन महसूलमंत्री ना.विखे पाटील यांच्या ह्स्ते संपन्न होणार आहे.

तसेच देवगड खंडोबा देवस्थानच्या परिसरात बहुजनांचे प्रेरणास्थान आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे.सदर कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे,आर.पी.आय चे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,भाजपा तालुकाध्यक्ष वैभव लांडगे,भाजयुमो प्रदेश सचिव ॲड श्रीराज डेरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,शहराध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले,डॉ अशोक इथापे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजपा तालुकाउपाध्यक्ष गणेश दवंगे, शाखा अध्यक्ष गणेश पावसे,केशव दवंगे हे उपस्थितीत राहणार आहेत.

शुक्रवारी सकाळी ११वा. देवगड खंडोबा देवस्थानच्या परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच बहुजनांचे प्रेरणास्थान आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन महसूलमंत्री ना.विखे पाटील, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या ह्स्ते संपन्न होणार आहे.त्यानंतर हिवरगाव देवगड रस्त्यावरील उंच पुलाचे भूमिपूजन,हिवरगाव पावसा ते उंबरवाडी रस्ता,हिवरगाव फाटा ते निमगाव टेंभी रस्त्याचे भूमिपूजन महसूलमंत्री ना.विखे पाटील यांच्या ह्स्ते संपन्न होणार आहे.तसेच देवगड ते हिवरगाव पावसा मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर हिवरगाव पावसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यालय समोर सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास महायुतीतील सर्व पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते,पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, मच्छिंद्र गडाख,चंद्रशेखर गडाख,सचिन सस्कर,दिगंबर पावसे,प्रकाश पावसे,किरण पावसे,भाऊसाहेब पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,सचिन गोफणे,भारत गोफणे,दादासाहेब गडाख,सोमनाथ दवंगे,सोमनाथ पावसे,प्रकाश पावसे यांच्या सह श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त व हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी केले आहे.

You cannot copy content of this page