मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर
अहिल्यानगर (प्रतिनिधी दि.१६):-राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे.पण तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे कसं पाहाल? जाणून घ्या
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
१)तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा https://electoralsearch.eci.gov.in/
३)आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला ३ पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, ‘Search by Mobile’ या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
३)आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा,यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
४)यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव,EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
४)यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव,EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
५)जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा.तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
SMS द्वारे मतदार यादीतील नाव तपासा एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा.त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा.हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा.याचं उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल.तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास,’नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज येईल.