अहिल्यानगर (दि.१६ प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगारांना नुकतेच हद्दपार केले आहे.निलेश उर्फ काळ्या मारुती जायभाय,अन्या उर्फ आनंद राजू नायक असे हद्दपार केलेल्या दोघांचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंगाने या दोघांना हद्दपार केले आहे.तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी पारीत केल्याने सदर इसमांना ताब्यात घेऊन अहिल्यानगर सरहद्दीच्या बाहेर सोडण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी/जगदीश मुलगीर,सफो/कैलास सोनार,पोहेकॉ/संदीप घोडके,दीपक शिंदे,रवी टकले,गोल्हार, कासार,प्रमोद लहारे समीर शेख यांनी केली आहे.