अहिल्यानगर (दि.१६ प्रतिनिधी):-महापालिकेच्या सावेडी प्रभाग समिती क्रमांक १ मध्ये जन्म मृत्यू कार्यालयामध्ये नागरिकांची दाखले काढताना मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
तेथील तो मुजोर कर्मचारी नागरिकांना कम्प्युटर बंद करून मी निघून जाईल मग लाईनीत उभा राहा अशी धमकीवजा भाषा वापरून नागरिकांना वेठीस धरत आहे.तसे पाहता प्रभाग समिती क्रमांक १ चे अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे व त्या कर्मचाऱ्यास समज दिली पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही.
दाखले घेण्यासाठी येणारे नागरिक संतप्त झाले असून उद्या महानगरपालिका आयुक्त यांची समक्ष भेट घेऊन त्या कर्मचाऱ्याची तक्रार करणार असल्याची नागरिकांमध्ये कुजबूज चालू होती.महानगरपालिकेचे आयुक्त यांनी नागरिकांना लवकरात लवकर जन्म मृत्यू दाखले मिळावेत यासाठी दाखला काढण्यासाठी येणारे नागरिक ज्या प्रभागात राहत असतील त्या ठिकाणी जन्म मृत्यू दाखला मिळण्याची सोय केली आहे.परंतु प्रभाग समिती क्रमांक १ मधील त्या मुजोर कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना तासनतास दाखले काढण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहेत.