अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ महाराष्ट्र राज्य महासंघाच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष प्रमुखपदी नेवासा तालुक्यातील चांदा येथील सामाजिक कार्यकर्ते बाबाभाऊ भगवान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्राच्या कार्यकारणी पदावर रुपचंद भाऊ सावंत (काष्टी),प्रदेश संघटक नाथा नारायण बाबर प्रदेश संपर्कप्रमुख (नेवासा) व संजयजी सावंत प्रदेश युवा उपाध्यक्ष (श्रीगोंदा), नितीन भाऊ शिंदे ढवळगाव (युवा जिल्हाध्यक्ष),फुलचंद सावंत (काष्टी) जिल्हा उपाध्यक्ष,सुदामजी सावंत जिल्हा संघटक यांची निवड करण्यात आली आहे.
सुदामजी सावंत यांची ही जिल्हासंघटक पदी निवड करण्यात आली आहे.यावेळी अहिल्यानगर नगर जिल्हाध्यक्ष बाबाभाऊ शिंदे म्हणाले की तालुक्यात विविध ठिकाणी शाखेचे उद्घाटन करून व तसेच पदाच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.