अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-फोनवर बोलत असताना एका व्हाट्सअप ग्रुपवर झालेल्या वादावादी नंतर ग्रुपमधून रिमूव करण्यासाठी ग्रुप ॲडमिनला फोन करून शिवीगाळ करत आंबेडकरी आणि मातंग समाजाबद्दल वादग्रस्त भाषा वापरून समाजाची बदनामी करत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
याबाबत आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आज अहिल्यानगर मधील आंबेडकरी समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेत आंबेडकरी आणि मातंग समाजाचा बद्दल वादग्रस्त भाषा वापरणाऱ्या सचिन कोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सचिन कोतकर या जातीयवादी वृत्तीच्या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट तसेच समस्त मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने नगर शहरात जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आरपीआय गवई गटाचे शहर अध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला आहे.