अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प हद्दीतील कापूरवाडी शिवारातील गावठी दारूच्या हातभट्टया भिंगार कॅम्प पोलिसांनी उध्वस्त केल्या आहे.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनी/जगदीश मुलगी यांना गोपनीय माहिती मिळाली की कापूरवाडी शिवारात दोन महिला गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने सपोनी. मुलगीर यांनी तात्काळ कॅम्प पोलीस स्टेशनचे अंमलदार यांना बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केल्याने अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचून सदर महिला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून जवळपास 38 हजार रुपये किमतीच्या गावठी दारू तयार करणेसाठी लागणारे रसायन व गावठी दारू जप्त केली.
त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.जगदीश मुलगीर,सफो.अजय नगरी,पोहेकॉ.संदीप घोडके,दीपक शिंदे,रवी टकले,मपोहेकॉ.मीना गहीले,प्रमोद लहारे, समीर शेख,मपोहेकॉ.तृप्ती कांबळे यांनी केली आहे.