भाजपा युवा मोर्चाच्या जामखेड शहराध्यक्षपदी समता ग्रुपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांची निवड
जामखेड प्रतिनिधी:-समता ग्रुपचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भाजपा युवा मोर्चाच्या जामखेड शहराध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
तसे पत्र मा.पालकमंत्री आ.प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. संतोष गव्हाळे यांनी जामखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण अहिल्या नगर मध्ये समता ग्रुपच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी तयार केली आहे.आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम होत असते.
यावेळी संतोष गव्हाळे म्हणाले की, मला पक्षाने काम करण्याची जी संधी दिली आहे त्या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही व पक्षासाठी प्रामाणिकपणाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशीद,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कार्ले,मा.पंचायत समिती सभापती डॉ.भगवान मुरूमकर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे,अमित चिंतामणी,पांडुरंग माने,शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.