माजी महापौर संदीप कोतकर यांचा जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा न्यायालयाने जिल्हा अट केली शिथील
अहिल्यानगर (दि.१८ प्रतिनिधी):-शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांची आज जिल्हा बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे.
त्यामुळे संदीप कोतकर यांना जिल्ह्यात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.उच्च न्यायालयात त्या बाबत त्यांची आज सुनावणी झाली.
ते नगर शहरातून विधानसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.त्यांना जिल्हा बंदीची अट आता शिथील करण्यात आली आहे.