विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चितच-आमदार बळवंत वानखडे
दर्यापूर प्रतिनिधी (कैलास गायकवाड):-अमरावती मधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघ-४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार,दर्यापूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अंजनगांव सूर्जी ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील रासेगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो.दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत बसवंत वानखडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.त्यांची या विधानसभा मतदारसंघात चांगली पकड आहे.कार्यकर्त्यांचे जाळे तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे व जनतेची मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे तसेच विकास कामेे ही मतदारसंघात भरपूर केलेले आहे. त्यामुळे यंदा त्यांचाच विजय निश्चित आहे अशी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.