नगर (प्रतिनिधी):- समस्त आंबेडकरी समाज व मातंग समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की,सचिन कोतकर यांची जी रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे त्या वायरल रेकॉर्डिंग मुळे समस्त मागासवर्गीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करून ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा व कोतकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अशा व्यक्तींची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व कोतकर यांनी पहिल्यापासून देखील बौद्ध व मातंग समाजाच्या कुटुंबीयांनाच टार्गेट केलेले आहे.
व निवडणुका जाहीर झाल्यावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा क्लिपा व्हायरल करत आहे व जिल्हाधिकारी यांना देखील मागणी करणार आहे की निवडणुकीच्या काळामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही समस्त समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पत्रकार परिषदेत दोन्ही समाजाच्या वतीने सांगितले आहे.
यावेळी आंबेडकरी समाजाचे अशोकराव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अजयराव साळवे,सुमेध गायकवाड,अनंत लोखंडे,सुनील क्षेत्रे, रोहित आव्हाड,किरण दाभाडे,अंकुश मोहिते, विशाल भिंगारदिवे, बाळासाहेब निकम, सुनील सकट,विशाल गायकवाड,अशोक भोसले,गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.