अहिल्यानगर (दि.१९ प्रतिनिधी):-धारदार तलवारी बाळगणाऱ्या ईसमा विरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई करून दोन तलवारी जप्त करून त्यास ताब्यात घेतले आहे.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी.जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली की,आय लव नगर चौकाच्या परिसरात सबस्टेशन जवळ काटवनात एक ईसम धारदार तलवारी विकण्यासाठी येत आहे.
आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सपोनी.मुलगीर यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले.तपास पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावला असता काटवानातून एक इसम हा प्लास्टिकची गोणी घेऊन आला त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागला पोलिसांनी त्याचा शिताफीने पाठलाग करून त्यास पकडले त्याला विश्वासात घेऊन विचारले असता तलवारी कशासाठी आणल्या आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की विक्री करण्यासाठी आणल्या आहेत.
त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव तोसिफ मन्सूर सय्यद असे सांगितले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरन.७३१/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. जगदीश मुलगी यांच्या तपास पथकातील पोहेकॉ.दीपक शिंदे,रवी टकले,संदीप घोडके, प्रमोद लहारे,महादेव पवार,समीर शेख यांनी केली आहे.