Maharashtra247

आ.बाळासाहेब थोरात समर्थक कार्यकर्त्‍यांनी महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्‍ये केला प्रवेश

 

संगमनेर (दि.१९ प्रतिनिधी):-तालुक्‍यातील मनोली येथील थोरात समर्थक कार्यकर्त्‍यांनी महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्‍ये प्रवेश केला.पेमगि‍री येथील कार्यकर्त्‍यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपामध्‍ये प्रवेश करुन आ.थोरातांना धक्‍का दिला असताना आता मनोली येथील पदाधिका-यांनीही विखे पाटील गटाला समर्थन दिल्‍याने भाजपामध्‍ये येण्‍याची थोरात समर्थकांची संख्‍या वाढली आहे.

मनोली येथील माजी सरपंच काशिनाथ रखमा साबळे,सोसायटीचे व्‍हा.चेअरमन लालगिर वसंत गोसावी, सोसायटीचे संचालक आण्‍णासाहेब साबळे, अशोक वसंत गोसावी, रमेश किसन शिंदे,राजेंद्र पाचोरे,मच्छिंद्र रावसाहेब गोसावी,रामनाथ वसंत गोसावी,सखाराम वसंत गोसावी,भाऊसाहेब गोसावी आदिंनी आज ना.विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यासर्वांचे पालकमंत्र्यांनी स्‍वागत करुन त्‍यांना पक्षकार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.मंत्री विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली संगमनेर तालुक्‍यातील थोरात समर्थक कार्यकर्ते भाजपामध्‍ये प्रवेश करीत असल्‍याने कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे.

तालुक्‍यातील पेमगिरी येथे दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांनी पक्षाचा त्‍याग करुन,विखे पाटील यांना समर्थन देण्‍याचा निर्णय केला.त्‍या पाठोपाठ आता मनोली येथील कार्यकर्त्‍यांनीही तीच भूमिका घेतल्‍याने भाजपामध्‍ये निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात इनकमींग वाढल्‍याची चर्चा तालुक्‍यात सुरु झाली आहे.विधानसभा निवडणूकीत संगमनेर विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळणार असल्‍याची चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरुन आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उमेदवारीवर होणारे शिक्‍कामोर्तल लक्षात घेवून तसेच भारतीय जनता पक्षाच्‍या कार्यक्रमांना तालुक्‍यात मिळणा-या प्रतिसादाच्‍या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्ष सोडणा-यांची संख्‍या वाढू लागली आहे.

You cannot copy content of this page