अहिल्यानगर (दि.१९ प्रतिनिधी):-गोवा येथून इंदौर,मध्यप्रदेश येथे विक्रीसाठी ट्रकमध्ये नेण्यात येत असलेली अवैध दारू जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठ्या प्रमाणात यश आले असून आरोपीकडून तब्बल 1 कोटी 02 लाख 69,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त व प्रलोभनमुक्त होण्यासाठी अवैध दारू व इतर बाबतीत कारवाई करण्या संदर्भात निवडणुक आयोगाने निर्देश दिलेले आहे.निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील आरणगाव दळवी वस्ती,बायपास रोड ता.अहिल्यानगर येथे कारवाई केली आहे.ताब्यात घेण्यात आलेले इसम नामे दिपक आदिकराव पाटील (ट्रकचालक/ मालक),वय 45, रा.धामवडे, रा.शिराळा, ता.सांगली,शहाजी लक्ष्मण पवार (चालक), रा.मलकापूर, ता.कराड,जि.सातारा, शैलेश जयवंत जाधव, वय 35, रा.इस्लामपूर,ता.वाळवा, जि.सांगली,हेमंत शहा,रा.401 ए विंग,चौथा माळा, लोटस शोरूमजवळ,इंदौर,मध्यप्रदेश हल्ली रा.मडगाव गोवा (फरार),सायमन उर्फ मायकल (फरार) पुर्ण नाव माहित नाही,जमीर मुलाणी रा.मलकापूर मार्केटजवळ, ता.कराड,जि.सातारा (फरार) व सुखदेवसिंग गिल उर्फ कवलजितसिंग भूल्लर उर्फ लवी शेठ,रा.10000 ए एम नायकनगर, शॉप नं.03, रिंगरोड,इंदौर मध्यप्रदेश यांचे विरुध्द पोकॉ/2679 जालींदर मुरलीधर माने,नेम स्थानिक गुन्हे शाखा,यांचे फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 788/2024 बीएनएस कलम 318(4), 336 (3), 340 (2), 341 (2), 3 (5)सह महा.प्रो.का.कलम 65 (A) (B) (E) (F), 66 (1) (B), 80 (1) (2), 81, 83, 90, 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपतराव भोसले नगर ग्रामीण उपविभाग,स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संतोष लोढे,फुरकान शेख,शरद बुधवंत,शिवाजी ढाकणे,बाळासाहेब गुंजाळ,जालींदर माने,प्रशांत राठोड,अर्जुन बडे तसेच रविंद्र कर्डिले व मेघराज कोल्हे यांनी केली आहे.