पाथर्डी प्रतिनिधी:-पाथर्डी येथील तहसील कार्यालयासमोर सामुहिक विहीर ताबा प्रकरणी गुरुवार दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी उपोषणास बसलेले वैजू बाभळगाव येथील अमोल फुलशेटे व दांपत्यास पाथर्डी पोलिसांनी बेदम मारहाण केली.
यानंतर ते जखमी झाल्याने पाथर्डी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.ही घटना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांना समजली.त्यांनी मारहाण झाल्याने फुलशेटे दांपत्याची रात्री १२ वाजता भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.यानंतर श्री.चव्हाण सर यांनी बेकायदेशीरपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करून कुटुंबास न्याय देण्यासाठी पूर्णपणे पाठीशी राहू असे आश्वासन दिले व तसेच उपोषण करते अमोल फुलशेटे यांनी त्या पोलिसांवर कडक कारवाई करून निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली.
या वेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,अरविंद साळवे,जिल्हा उपाध्यक्ष राजूशेठ पठाण,अझर शेख,रज्जाक व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.