आमदार चित्राताई वाघ यांचा भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या माया माने यांनी मुंबईत केला सत्कार
प्रतिनिधी:-राज्यपाल कोट्यातून भाजप नेत्या चित्राताई वाघ यांची आमदारपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.त्याबद्दल माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सोलापूर जिल्हा सहसंयोजिका सामाजिक कार्यकर्त्या सौ.माया माने यांनी नवनियुक्त आमदार सौ.चित्राताई वाघ यांचा सूर्यवंशी हॉल,दादर पश्चिम,मुंबई येथे सत्कार केला.
यावेळी सौ.माया माने यांच्यासह मुंबई ओबीसी मोर्चा मधील महिला सदस्य व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार चित्राताई वाघ यांचा सत्कार सन्मान सोहळा करून त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.