टेलिफोनची महागडी तांब्याची केबल चोरणारे तिघे जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
अहील्यानगर (दि.२२):-स्टेट बँक ते आय लव नगर रोडवर कॉन्व्हेंट हायस्कूल जवळील दक्षिण बाजूस जमिनीत गाडलेली १३७ मीटर लांबीची बाराशे पेअर तांब्याची केबल तीन इसम व्हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कट करून चोरून नेत होते.तपास पथकाचे अंमलदार त्या ठिकाणावरून पेट्रोलियम करत असताना त्यांनी पाहिले व त्या तीन इसमाना शिताफीने पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे प्रकाश रभाजी वाघ,श्रीप्रसाद गोविंदराव मेहत्रे,दीपक सुभाष गायकवाड असे सांगितले.त्यांच्या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरन ७३६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आरोपींनी यापूर्वी नटराज टॉकीज समोरील गुरुद्वारा जवळील जमिनीत गाडलेली ४० हजार रुपये किमतीची टेलीफोन केबलची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कारवाई हि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी. जगदीश मुलगीर यांच्या तपास पथकातील पोहेकॉ.दीपक शिंदे,रवी टकले,संदीप घोडके,अजय गव्हाणे, थोरात,वाहन चालक बेरड,प्रमोद लहारे अमोल आव्हाड,समीर शेख यांनी केली आहे.