अहिल्यानगर (दि.२२):-जिल्हा रोल बॉल संघटना व टीम टॉपर स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्केटिंग व रोल बॉल प्रशिक्षण शिबीर दि.२७ ते ३० ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ७ ते ९ वाजेर्यंत जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क येथे आयोजन केले आहे.ही माहिती रोल बॉल संघटना अध्यक्ष श्री.प्रदीप पाटोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रोल बॉल क्रीडा प्रकारच्या प्रचार व प्रचारासाठी २००३ पासून कार्यात असून दोन हजारापेक्षा जास्त खेळाडूंना प्रशिक्षण दिले असून राज्य,राष्ट्रीय तसेच आंरराष्ट्रीय आशियाई,व जागतिक स्पर्धांमध्ये अहील्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंनी यश संपादन करून जिल्हयाचे नावलौकिक केले आहे तसेच शासकीय लाभ मिळून दिला आहे क्रीडा गुण सवलत,उच्च शिक्षण खेळाडू आरक्षण, खेळाडू नोकरी भरती असे अनेक शासकीय योजनांचा लाभ खेळाडूंना मिळून दिला आहे,खेळाडूंना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा रोल बॉल संघटना व टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी च्या वतीने विविध व्यावसायिक संस्थांशी सयुक्तिक उपक्रमांतर्गत सावेडी उपनगरात राष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रींक श्री.चेतनजी शहणे (संस्थापक राज्यस्व स्पोर्ट्स क्लब) यांच्या सहकार्याने लवकरच जिल्ह्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अगोदर श्री.गणेश भोसले (मा.उपमहापौर ) यांच्या विशेष प्रयत्नातून बुरुडगाव रोड,येथे ३५० आसणं क्षमतेचे मिनी स्केटिंग व रोल बॉल स्टेडियम खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.आगामी काळात या सारखे उपक्रम जिल्ह्यातील विविध भागात राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटना सचिव श्री. प्रशांत पाटोळे यांनी दिली.अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना या क्रीडा प्रक्रचा लाभ मिळून देण्याचा मानस आहे.सदर प्रशिक्षण शिबीर पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचे शगुन ज्वेलर्स चे संचालक श्री.सुनील डहाळे यांनी या वेळी जाहीर केले तसेच या प्रशिक्षण शिबिर दरम्यान क्रीडा शिक्षक,वरिष्ठ खेळाडू व क्रीडा प्रेमी करीता प्रशिक्षक प्रशिक्षण व पंच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
सदर प्रशिक्षण शिबीर व पंच परीक्षा साठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू व प्रशिक्षक यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
अधिक माहिती करिता संपर्क
अधक्ष श्री.प्रदीप पाटोळे ८२७५१९१७७१
किंवा सचिव श्री.प्रशांत पाटोळे ८०८७८७०८९९.