हिवरगाव पावसा येथे युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन;डाॅ.सुजयदादा विखे पाटील युवकांशी संवाद साधणार
संगमनेर प्रतिनिधी/(नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे महायुतीच्या वतीने युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डाॅ.सुजयदादा विखे पाटील युवकांशी संवाद साधणार आहेत.
सदर मेळाव्यास भाजपा तालुकाध्यक्ष वैभव लांडगे,भाजयुमो प्रदेश सचिव ॲड.श्रीराज डेरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले,डॉ. अशोक इथापे,प्रमोद रहाणे,रामभाऊ रहाणेे तसेच महायुतीतील सर्व पक्ष संघटनाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.बुधवारी सायं. 7 वा. हिवरगाव -देवगड रस्त्यावर हिवरगाव पावसा येथे युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यास महायुतीतील सर्व पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते,पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे अवाहन भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, शाखा अध्यक्ष गणेश पावसे,केशव दवंगे, सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,मच्छिंद्र गडाख,चंद्रशेखर गडाख,सचिन सस्कर,दिगंबर पावसे,प्रकाश पावसे,किरण पावसे,भाऊसाहेब पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,सचिन गोफणे,भारत गोफणे,दादासाहेब गडाख,सोमनाथ दवंगे,सोमनाथ पावसे,प्रकाश पावसे यांच्या सह भाजपा कार्यकर्ते व हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी केले आहे.