अहिल्यानगर (दि.२२ ):-एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गिते वस्ती वडगाव गुप्ता शिवार येथे विनापरवाना अवैध्यरित्या धारधार तलवार बाळगणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी.माणिक चौधरी यांना दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे अनिश बाळू पवार (रा.गजानन कॉलनी नवनागापुर ता.जि.अहिल्यानगर) हा गिते वस्ती वडगाव गुप्ता शिवारात अवैध्यरित्या लोखंडी धारधार तलवार घेवुन फिरत आहे.
यावरुन सापोनी.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर इसमास गिते वस्ती वडगाव गुप्ता शिवार येथे ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिश बाळू पवार (वय-२४ वर्ष रा.गजानन कॉलनी नवनागापुर ता.जि.अहिल्यानगर) असे सांगितले त्याची झड़ती घेतली असता त्याचे जवळ एक धारधार लोखंडी तलवार मिळुन आली.सदर तलवार त्याचे कडून जप्त करुन त्या इसमा विरुदध एमआयडीसी पोस्टेला भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढ़ील कारवाई करत आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई. विकास जाधव,पोहेकॉ राजु सुद्रिक,पोहेकॉ साबीर शेख,पोकॉ/ किशोर जाधव,पोकाँ/ सुरज देशमुख,पोकॉ/ शुभम सुद्रक यांचे पथकाने केली आहे.
