Maharashtra247

कु.राजश्री कविता मिलिंद राजगुरू IBMRD MCA बॅच 2022-24 ची टॉपर;डॉ.विठ्ठलराव विखे फाउंडेशन इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट महाविद्यालयात पुणे उपकुलगुरूंच्या हस्ते गौरव 

 

अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथील विळद घाटातील डॉ.विठ्ठलराव विखे फाउंडेशन इंस्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट महाविद्यालयात अभिक्रमा द इंडक्शन प्रोग्राम फॉर फर्स्ट ईयर स्टुडेंट्स ऑफ MCA,MBA,BCA आणि BBA दिमाखात पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ.पराग काळकर,डॉ.विठ्ठलराव विखे फाउंडेशनचे विश्वस्त ॲड.श्री.वसंतराव कापरे,सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड,डॉ. विठ्ठलराव विखे फाऊंडेशनच्या व्यवसाय व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास IBMRD संस्थेचे संचालक डॉ.संजय धर्माधिकारी आणि समस्त शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते IBMRD MCA बॅच 2022-24 टॉपरसाठी ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थिनी कु.राजश्री कविता मिलिंद राजगुरू हिला पुरस्कृत करण्यात आले.भाषणात ॲड.कापरे सरांनी कु.राजश्री कविता मिलिंद राजगुरू हिच्या आईने मुलीला उच्चप्रतीचे शिक्षण मिळावे या साठी केलेल्या संघर्षाचे व उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे विशेष कौतुक केले.आणि महाविद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले.शेवटी उपकुलगुरु यांनी विद्यार्थ्याना आत्मचिंतन करून यशस्वी होण्याकरिता स्वतःमध्ये करावयाचे बदल यावर प्रबोधन केले.

You cannot copy content of this page