Maharashtra247

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

 

 

अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर गणेश भोसले,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,भाजपाचे समन्वयक महेंद्र भैय्या गंधे,मा.नगरसेवक सचिन जाधव,मा.नगरसेवक किशोर डागवाले,मा.नगरसेवक अविनाश घुले, प्राध्यापक माणिकराव विधाते,संजय चोपडा,मा.नगरसेवक रवींद्र बारस्कर,अमोल गाडे,प्रा.अरविंद शिंदे,संजय ढोणे,सतीश शिंदे,अजय चितळे,उदय कराळे,नरेंद्र कुलकर्णी, अभिजीत खोसे,वैभव ढाकणे,ज्ञानेश्वर काळे,अमित गटणे, मनोज ताठे,अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप म्हणाले की,विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या कामावर लढवली जात असून सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे आशीर्वाद घेतले जातील,निवडणूक लढवीत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे, आपल्या शहरा बद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विकासाच्या योजना राबवत आहे.जनतेच्या मतरुपी आशीर्वादामुळे माझा विजय निश्चित असून पुढील ५ वर्षात विकास कामातून शहराचा कायापालट करेल असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page