Maharashtra247

भिंगार कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई गावठी कट्ट्यासह इसम जेरबंद

 

अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी.जगदीश मुलगीर यांना यांना गोपनीय माहिती मिळाली की,एक इसम एल.आय.सी.ऑफिसच्या पाठिमागे असणारे पंडित नेहरु विद्यालया जवळ गावठी कट्टा अवैधरित्या घेऊन फिरत आहे.

आता गेल्यास मिळन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहा.पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम एल.आय.सी. ऑफिस कडुन पंडित नेहरु विद्यालयाचे गेटजवळ अंधारात येताना दिसला.सदर इसमास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळुन जाऊ लागला त्याचा पोलीस तपास पथकातील अंमलदारांनी पाठलाग करुन त्याचेवर झडप घालुन पकडून त्याची झडती घेतली असता त्याचे पँटचे खशात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश विठ्ठल मोरे (वय 20 वर्ष, रा.निंबोडी,ता.जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितल्याने सदर इसमाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. 746/2024 भारतीय शस्त्र कायदा कलम 3, 25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक श्री. जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे,चंद्रकांत माळोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे,रवि टकले,संदिप घोडके,इस्त्राईल पठाण व पोकॉ.समीरशेख, प्रमोद लहारे,वैभव झिने यांनी केली आहे.

You cannot copy content of this page