वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ इसमावर वर कारवाई झालीच पाहिजे परंतु जाळपोळ करणाऱ्यांवर देखील कारवाई झालीच पाहिजे डॉ.सुजय विखे
अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विखे आणि थोरात यांचा वाद पुन्हा एकदा टोकाला गेला आहे.संगमनेर येथील डॉ.सुजय विखे यांच्या सभेत आ.बाळासाहेब थोरात यांची मुलगी डॉ.जयश्री थोरात यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले.
गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे,पण…सुजय विखे म्हणाले की वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी.मात्र जाळपोळ करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे.अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी दिली.वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा मी निषेध करणारच होतो.मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ सुरु केली, गाड्या फोडल्या, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न केला.वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.मात्र ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.गाड्या जाळणाऱ्यांचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आहेत.मात्र मला वातावरण पेटवायचे नाही.या सगळ्या प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.
महिलांबद्दल कुणीही अशी टीका करू नये. माझ्या भाषणात मी जयश्री थोरात यांना ताई म्हणूनच संबोधित करतो.मलाही बहीण आहे,माझ्याही घरात महिला आहेत.मात्र कुणीही महिलांबद्दल खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे सुजय विखे म्हणाले.