महाविकास आघाडी कडून नगर शहर मतदार संघात मा.महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर
अहिल्यानगर (दि.२६ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून कोण उमेदवार असणार याबाबत गेल्या अनेक दिवसांची नगर शहरातील नागरिकांची उत्कंठा आता संपली असून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ही दुसरी यादी जाहीर झाली या यादीमध्ये अहिल्यानगर मतदार संघाचे विधानसभेचे उमेदवार म्हणून अभिषेक कळमकर यांचे नाव आता अंतिम झाले आहे.